बौद्ध धर्म आणि जागतिक शांतता – मानवजातीसमोरील एक वळण
नव्याने सचेतन झालेल्या बौद्ध धर्मात आणि त्याच्या परंपरागत अवतारात जाणवणारा मुख्य फरक म्हणजे त्यांच्या सैद्धान्तिक भूमिकांत जाणवणारे अंतर. नवीन गट दोन्ही हात पसरून समाजाला, त्यांची जनकल्याणाची कामे आणि सामाजिक उद्दिष्टे यांना, भरभरून साहाय्य करताना दिसतात. हे नवबौद्धवादी गट समाजकल्याण, आरोग्य सेवा, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनामध्ये मग्न झाल्यामुळे धर्मोपासनेचा मार्ग एकदम बदलून गेल्याचे दृश्य दिसते.......